दिल्ली – कोरोना विषाणूमुळे जगभरात धुमाकूळ घातला असून देशात देखील परिस्थिती खराब आहे. त्याच पार्श्वूमीवर कोणत्याही प्रकारच्या अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रेल्वेने कंबर कसले असून रेल्वेने 3000 विलागिकरन कक्ष बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली येथे वैद्यकीय विभागाच्या सल्ल्यानुसार विलागिकरन कक्ष असलेल्या बोगी बनवण्याचे काम सुरू झाले आहे. कोरोनासंदर्भात रेल्वे आवश्यक ते सेवा, सुरक्षिततेशी संबंधित देखभाल आणि तपासणीचे काम, मालमत्ता संरक्षण व स्वच्छतेसह अनेक प्रयत्न करत आहे.