Saturday, November 23, 2024
Homeक्रीडाभारत-न्यूझीलंड टी-२० मालिका २४ जानेवारीपासून

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका २४ जानेवारीपासून

ऑकलंड : येत्या २४ जानेवारी पासून भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमधील ५ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना ईडन पार्क ऑकलंड या मैदानावर होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १२:३० वाजता करण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, विंडीज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया या संघाना आपल्या घरच्या मैदानावर पराभूत करून आता भारतीय संघ नव्या वर्षात न्यूझीलंड संघाला आता त्यांच्याच धर्तीवर पराभूत करण्यासाठी विराट कोहली अँड कंपनी सज्ज झाली आहे. पण भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्ध टी २० सामन्यात रेकॉर्ड खूप खराब आहे. भारतीय संघाला हा रेकॉर्ड सुधारण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ऑस्ट्रेलिया २४५-५ १६ फेब्रुवारी २०१८ नीचांकी धावसंख्या १०७ न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका १७ फेब्रुवारी २०११७ सर्वात मोठा विजय न्यूझीलंड ८१ धावांनी विरुद्ध विंडीज ११ जानेवारी २०१४ निसटता विजय दक्षिण आफ्रिका ३ धावांनी विरुद्ध २२ फेब्रुवारी २०१२ विरुद्ध न्यूझीलंड सर्वाधिक धावा मार्टिन गप्टिल १२ सामने १२ डाव १ नाबाद ५०८ धावा फलंदाजीतील सरासरी ४६. १८ सर्वाधिक स्कोर १०५सर्वाधिक विकेट्स ३. ५ षटके ० निर्धाव २४ धावा ५ विकेट्स इम्रान ताहीरएका डावातील बेस्ट बॉलिंग फिगर्स टीम साऊथी ४ षटके १ निर्धाव १८ धावा ५

सर्वाधिक झेल मार्टिन गप्टिल २०१०-२०१९ १२ सामने झेल १०
एका डावात सर्वाधिक झेल मार्टिन गप्टिल ३ न्यूझीलंड ११ फेब्रुवारी २०१२
भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल , शिखर धवन , रोहित शर्मा , विराट कोहली , श्रेयस अय्यर रिषभ पंत मनीष पांडे यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये रविंद्र जडेजा , शिवम दुबे , वॉशिंग्टन सुंदर आहेत. गोलंदाजीत नवदीप सेनी , जसप्रीत बुमरा शार्दूल ठाकूर , मोहंमद शमी युझवेन्द्र चाहल आणि कुलदीप यादव आहेत.
न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीची मदार केन विलियम्सन , रॉस टेलर , मार्टिन गप्टिल , कोलिन मुनरो टीम सिफ्रेट आहेत. अष्टपैलूंमध्ये मिचेल संतनेर , डी ग्रँडहोम गोलंदाजीत टीम साऊथी, ईश सोधी, मिचेल संतनेर आहेत.

आमनेसामने ११ ८ विजयी न्यूझीलंड ३ विजयी भारत
यांच्यावर असेल नजर रोहित , विराट , विलियम्सन , संतनेर
हवामान : अंशतः सूर्यप्रकाश

न्यूझीलंड : केन विलियम्सन, हेमीष बेनेट, सॅम ब्रुन्स, स्कॉट कुगेलिन, डी ग्रँडहोम , डेरी मिचेल, मार्टिन गप्टिल, कोलिन मन्रो, रॉस टेलर, टिकनेर मिचेल, संतनेर, टीम सिफरेत, ईश सोधी, आणि टीम साऊथी

भारत : रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, मनीष पांडे, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, मोहंमद शमी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, नवदीप सेनी.

-सलिल परांजपे, देशदूत नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या