Friday, May 3, 2024
Homeनगरप्राध्यापकाकडून विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी

प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आपल्या हातात अंतर्गत (इंटरनल) गुण असल्याने बेलापुरातील 12 वीच्या एका विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली. या प्राध्यापकास प्राचार्यांनी नोटीस बजावली आहे.

याबाबत बेलापुरात सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार एका महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेत शिकवणार्‍या प्राध्यापकाने आपल्या हातात अंतर्गत गुण आहेत असे सांगून एक विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली.

- Advertisement -

सदर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी याबाबत प्राचार्यांना माहिती दिली. त्यांनी संबंधित प्राध्यापकाला नोटीस दिली असून त्याची प्रत संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आली आहे. याबाबत सखोल चौकशी करून पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून दोषी असल्यास संबंधित प्राध्यापकावर योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णयही पदाधिकार्‍यांनी घेतला असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या