नवी दिल्ली – काही दिवसांपासून एनआरसीवरून दिल्लीमध्ये हिंसाचार सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 42 वर पोहोचला आहे. तर 250 हून अधिक जण यामध्ये जखमी झाले आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात एकूण 630 लोकांना अटक केली आहे. तर या प्रकरणी एकूण 148 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
दंगलीबाबतचे उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे काम सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. आज सकाळी मौजपूर आणि जाफराबादमध्ये लोकांचे जनजीवन सुरळीत सुरू आहे.
तथापि, या सर्व भागांमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. दंगलग्रस्त भागात कलम 144 लागू केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेवून परिस्थितीची माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारावर नियंत्रण आले असून दंगलग्रस्त भागात जनजीवन पूर्ववत होत आहे. मात्र, सर्व दंगलग्रस्त भागांमध्ये पोलिस तैनात आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत शांतता समितीच्या सुमारे 400 बैठका घेतल्या आहेत.
शुक्रवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या 42 झाली. या हिंसाचारात 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रामुख्याने झाफराबाद, मौजपूर, चांदबाग, खुरेजी खास आणि भजनपुरा या भागांत मोठे नुकसान झाले आहे.