Friday, May 3, 2024
Homeनगरशासकीय निधी केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच ठेवण्याचे आदेश

शासकीय निधी केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच ठेवण्याचे आदेश

खाजगी, सहकारी बँकांमधील बँक खाती बंद करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे इत्यांदींनी त्यांच्याकडील सर्व बँकिंग विषयक व्यवहार राष्ट्रीयीकृत बँकांमार्फतच पार पाडावेत, असे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. यापूर्वी खासगी अथवा सरकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती 1 एप्रिल 2020 पासून बंद करून केवळ राष्ट्रीयीकृत बँकात खाती उघडण्यात यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

1 एप्रिल 2020 पासून कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते या प्रयोजनासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावी तसेच कोषागारांनी एप्रिल आणि मे 2020 मधील देय वेतनाचे देयक पारित करताना याबाबत खातरजमा करावी.

वेतन व भत्त्यासंदर्भात शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांची यादी
भारतीय स्टेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा.

निवृत्ती वेतनासंदर्भात शासनाशी करार केलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची यादी
भारतीय स्टेट बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, आलाहाबाद बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक.

- Advertisment -

ताज्या बातम्या