श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील मांडवगण, महंडूळवाडी, भावडी, कोकणगाव या चार गावांच्या सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. तर लोणी व्यंकनाथ आणि टाकळी लोणार गावच्या सरपंच पदाची पोटनिवड णूक आणि इतर 21 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहेत. यात सरपंच पदासाठी लोणी, भावडीत दुरंगी, महांडूळवाडीत तिरंगी, तर टाकळी लोणार मध्ये चौरंगी लढत होत आहे. मांडवगणमध्ये चौरंगी लढत होत आहे.
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून याच बरोबर दोन गावांचे सरपंच आणि 21 गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. यात महांडूळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दत्तात्रय घाडगे, गणेश मनसुके, रोहिदास महांडुळे यांच्यात लढत होत आहे. भावडीच्या सरपंच पदासाठी धनश्री करनोर आणि ज्योती कोरडकर यांच्यात लढत होत आहे.
मांडवगणचे सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला साठी राखीव असून यात अर्चना लोखंडे, सुलभा सदाफुले, वंदना शिंदे, अर्चना चव्हाण यांच्यात लढत होत आहे. लोणीच्या सरपंच पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत 5 अर्ज दाखल झाले असून यात रामदास ठोंबरे आणि स्वप्नील गायकवाड यांच्यात लढत होत आहे. टाकळी लोणारच्या सरपंच पदासाठी सूर्यभान जगदाळे, नवनाथ िशिंदे, सुभाष शिंदे, सचिन सुडगे यांच्यात लढत होत आहे.
मांडवगण ग्रामपंचायत मध्ये जोरदार लढत होणार आहे. तर लोणी व्यंकनाथ मध्ये पोटनिवडणुकीत माजी सरपंच संतोष माने यांनी भरलेला अर्ज मागे घेतला. नायब तहसीलदार योगिता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होत आहे.