Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनडॉ. निलेश साबळे यांचा स्पर्धक ते यशस्वी सूत्रसंचालक असा थक्क करणारा प्रवास

डॉ. निलेश साबळे यांचा स्पर्धक ते यशस्वी सूत्रसंचालक असा थक्क करणारा प्रवास

मुंबई : चला हवा येऊ द्या या भन्नाट कार्यक्रमातून घरोघरी पोहचलेल्या डॉ. निलेश साबळे यांचा आज वाढदिवस.

कसे आहात, मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे, या वाक्याने ज्या उमद्या कलाकाराला ओळख मिकवून दिली ते म्हणजे डॉ.साबळे. परंतू या यशस्विते मागे थक्क करणारा प्रवास असल्याचे जाणीव होते. लहानपणापासून असलेली अभिनयाची आवड त्याला झोपू देत नव्हती. पण वडिलांच्या सांगण्यानुसार डॉ.साबळे यांनी डॉक्टर होत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कामाला सुरवात केली. मात्र अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी त्यांच्या वडिलांनीच त्याला या क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार त्याने गिरीश मोहितेच्या ‘नान्याच्या गावाला जाऊ या…’या मालिकेत काम केले. त्यानंतर झी टीव्हीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमासाठी ऑडिशन दिली आणि तो निवडला गेला. इतकेच नाही तर या कार्यक्रमाचा तो विजेतासुद्धा ठरला आणि त्यानंतर सुरु झाला अभिनय क्षेत्रातील खरा प्रवास!

- Advertisement -

त्यानंतर अभियानाची गाडी रुळावर आली. त्यांनतर न थांबता डॉ. साबळे यांनी ‘होम मिनिस्टर’, ‘फू बाई फू’ या शोजमध्ये मोहर उमटवली. शिवाय ‘नवरा माझा भवरा’, ‘बुध्दीबळ’, ‘एक मोहर अबोल’या सिनेमांमध्ये निलेश साबळे झळकले. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ च्या कार्यक्रमातून आला त्यांच्या आयुष्यात आला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट.

भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे या हास्य दुनियेतील अवलियांना घेऊन ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरु केला. २०१४ मध्ये सुरु केलेल्या या कार्यक्रमाने निलेश यांना उत्तम सूत्रसंचालक, लेखक आणि नकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमाची न केवळ मराठी सिनेसृष्टीला तर बॉलिवूडला भुरळ पडली. ज्याच्या जोरावर मराठी कलाकारांसोबत शाहरुख खान, काजोल, दीपिका पादुकोण, गोविंदा यांसारखे अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...