Sunday, May 26, 2024
Homeदेश विदेशसातार्‍याचे जवान संदीप सावंत शहीद

सातार्‍याचे जवान संदीप सावंत शहीद

श्रीनगर – मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत (वय 25) व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत शहीद झाले. शहीद सावंत हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी होते.

नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत हे गस्तीवर असतांना नियंत्रण रेषेवरील जंगलात त्यांना हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह गस्तीवर असलेले अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. पाहाटेची वेळ असल्याने दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची संख्या कळू शकत नव्हती.

- Advertisement -

त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्याच दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या