Tuesday, April 1, 2025
Homeदेश विदेशशपथविधीसाठी केजरीवालांचे मोदींना आमंत्रण

शपथविधीसाठी केजरीवालांचे मोदींना आमंत्रण

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल उद्या (16 फेब्रुवारी) तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दिल्लीकर जनतेला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

रविवारी होणार्‍या शपथविधी सोहळ्याला केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही.

- Advertisement -

रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर लगेचच आम आदमी पक्षाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपच्या सात खासदारांनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण धाडण्यात आल्याचं समजतंय. परंतु, पंतप्रधान मोदी या सोहळ्यात सहभागी होणार किंवा नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

पंतप्रधान उद्या वाराणसीत –

पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमानुसार 16 फेब्रुवारी रोजी ते आपल्या लोकसभा क्षेत्रात अर्थात वाराणसीमध्ये असतील. इथं ते वाराणसीला जवळपास 1700 करोड रुपयांच्या योजना बहाल करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Suresh Dhas : “खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खूनाचा कट...

0
मुंबई | Mumbai बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे प्रकरण उचलून धरणारे भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी...