Tuesday, May 7, 2024
Homeनगरकर्जमाफी : 2500 कोटींचा निधी

कर्जमाफी : 2500 कोटींचा निधी

कामाला वेग, पात्र लाभार्थींना होणार लाभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची सरकारकडून जोरदार तयारी सुरू असून या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना द्यावयाच्या लाभासाठी दोन हजार पाचशे कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 68 गावांमधील 15 हजार शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. विधिमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली. दुसरी यादी 28 तारखेला जाहीर करण्यात येणार आहे.

त्यामुळे या योजनेसाठी पैसा गरजेचा होता. त्यामुळे आकस्मिकता निधीतून अतिरिक्त 2500 कोटींना निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकही जाहीर झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या