Sunday, May 18, 2025
Homeनाशिकसिन्नर : दापुर परिसरातील आदिवासी कुटुंबांना २५ हजारांचे किराणा साहित्य वाटप

सिन्नर : दापुर परिसरातील आदिवासी कुटुंबांना २५ हजारांचे किराणा साहित्य वाटप

चापडगाव : महावितरणच्या दापुर कक्ष कार्यालयातील सहाय्यक अभियंता पंकज चौधरी, वायरमन संजय वाणी यांनी स्वखर्चातून परिसरातील ९० आदिवासी कुटुंबांना २५ हजार रुपयांचा किराणा वाटप केला.

- Advertisement -

करोनामुळे हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारकडून टप्प्या टप्प्याने लॉक डाऊन कालावधी वाढवला जात असल्याने दापुर परिसरातील आदिवासी कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. मोलमजुरीची कामे करणाऱ्या या कुटुंबांचा रोजगार करोनामुळे हिरावला असल्याची बाब चौधरी यांनी समजली.

त्यांनी या कुटुंबासाठी मदत करण्याची तयारी दाखवल्यावर वाणी यांनी देखील आपले योगदान देऊ केले. या दोघांनी मिळून २५ हजार रुपयांचा किराणा विकत घेऊन ९० कुटुंबासाठी स्वतंत्र पॅकेट तयार केले. कुठलीही गर्दी न जमवता हा किराणा संबंधित लाभार्थीना घरपोच देण्यात आला.

सरकारकडून रस्त्याने प्रवास करणाऱ्या मजुरांना मदत देण्यात येत आहे. अनेक संस्था देखील या उपक्रमात पुढे आहेत. बहुतेक वेळा मदत देणारा गर्दी जमवून स्वतःचा तोरा मिरवून घेत असतो. मात्र, चौधरी, वाणी यांनी कुणाकडे चर्चा न करता आपल्या परीने आदिवासी कुटुंबाना मदत केली आहे. याबाबत माहिती समजल्यावर दापुर परिसरात त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोठी बातमी! इस्रोची १०१ वी मोहीम अयशस्वी; देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09...

0
नवी दिल्ली | New Delhi इस्रोने आज (रविवारी) सकाळी ५.५९ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61...