Friday, May 3, 2024
Homeनाशिकगणेशगाव (त्र्यं) : शॉर्टसर्किटमुळे रोहिले येथील वनास आग; तीनशे पेक्षा अधिक रोपांचे...

गणेशगाव (त्र्यं) : शॉर्टसर्किटमुळे रोहिले येथील वनास आग; तीनशे पेक्षा अधिक रोपांचे नुकसान

वेळुंजे | वि. प्रतिनिधी : गणेशगाव शिवारातील वनविभागा च्या अखत्यारित असलेल्या वनास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली.

दरम्यान (दि. १३) रोजी दुपारच्या सुमारास ही आग लागली. नाशिक उप वन विभाग (पश्चिम) वन परिक्षेत्र नाशिक राऊंड गिरणारे या क्षेत्रातील रोहिले या गावच्या शिवारात विद्युत पुरवठा करणारी मुख्य लाईन या वनक्षेत्रातून गेली आहे.

- Advertisement -

या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरती अचानक शॉर्ट सर्किट होऊन खाली जाळ पडल्याने वनास आग लागली. या आगीत किमान तीनसे ते साडे तीनशे रोपे जळून खाक झाली आहेत.

यावेळी स्थानिक वनमजुरांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच ही आग विझविली. या मुळे किमान एक लाख रोपांना वाचविण्यात यश आले.

सन २०१८ ते १९ या वर्षात या ६५ हेक्टर व त्याला लागून असणारे ८० हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून या ठिकाणी अनेक प्रकारची जंगली व फळ झाडे लावली आहेत. यात आवळा अंबा, जांभूळ, शिताफळ इत्यादी फळ झाडे तसेच शिसव, उंबर, सादडा, बेल, काशीद तसेच अनेक वनौषधी झाडे या ठिकाणी आहेत.

हा वणवा विझवण्यासाठी वन मजूर श्री. अंबादास मोंढे, मंगळू खोडे, कचरू मोंढे, चिमा खोडे, धनराज खोटरे, बाळू महाले इत्यादीसह इतर ग्रामस्थांनी मदत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या