इगतपुरी । लवकरच इगतपुरी रेल्वे स्थानकावर जेष्ठ नागरिक, महीला व लहान मुलांसाठी नीर प्लांट आणि सरकता जिना सुरु करण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वे कडुन हिरवा कंदील मिळाला असुन नुकतीच मध्य रेल्वेच्या झेड.आर.यु.सी.सी. सदस्यांची बैठकिट हा निर्णय घेण्यात आला.
अनेक दिवसांपासुन इगतपुरी रेल्वे स्थानकावर सरकता जिना (एक्सलेटर) लावण्यात यावा तसेच प्रवाशांना शुध्द व कमी दरात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शहरात रेल्वेचा निर प्लांट व्हावा या मागणीसाठी समितीचे विभागीय सदस्य महेश श्रीश्रीमाळ यांनी पाठपुरावा केला होता.
अखेर हि मागणी मध्य रेल्वेने मान्य केली असून लवकरच स्थानकांवर या दोहोंची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. नुकतीच मुंबई येथे झेड.आर.यु.सी.सी. सदस्यांची बैठक महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत इगतपुरी येथील या समितीचे विभागीय सदस्य महेश श्रीश्रीमाळ यांच्या निर प्लांट व सरकता जिना या दोन्ही मागण्या मंजूर करण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी इगतपुरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झाले, यावेळी पायऱ्यांची उंची वाढविण्यात आली. परंतु यामुळे जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती स्रिया, आजारी व्यक्ती यांचे खुप हाल होत असत. हा त्रास दुर करण्यासाठी श्रीश्रीमाळ यांनी इगतपुरी रेल्वे स्थानक येथे सरकता जिना (एक्सलेटर) लावण्याची मागणी केली होती ती मंजुर करण्यात येऊन, मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले.