नवी दिल्ली : गरीबांना पुढील २ महिने मोफत धान्य, डाळी मिळणार असून खर्चाचा ८५ टक्के भार हा केंद्राने उचचल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेत सांगितले.
आत्मनिर्भर विशेष पॅकेज अंतर्गत अर्थमंत्री मागील ४ दिवसांपासून माहिती देत आहेत. आज त्यांची ५ वी आणि अखेरची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
ऑनलाईन शाळा सुरु करण्याचा प्रयत्न असून ग्रामीण भागातही ऑनलाईन शाळा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शाळांसाठी नव्या १२ ऑनलाईन सुविधा आणण्यात आल्या आहेत. तसेच ई पाठशाला साठी २०० नवी पुस्तकं तयार करण्यात आली आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेत सांगितले. लॉकडाऊनसह गरीब कल्याण फंड सुरु करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. व्हर्च्युअल लर्निंगवर भर देण्यात येणार आहे असेही सांगितले.
तसेच पीपीई, मास्कचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला असून आरोग्य कर्मचारी कायद्यात देखील सुधारणा करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेत सांगितले. लॉकडाऊनसह गरीब कल्याण फंड सुरु करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
ब्लॉकलेवल वर चाचणी केंद्र उभारणार असून सर्व जिल्ह्यात विषाणूचा फैलाव रोखण्याचे किट दिले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. जनधन योजने अंतर्गत १०,०२५ कोटी जमा झाले असून प्रगत तंत्रज्ञानामुळे गरीबांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेत सांगितले.
आत्मनिर्भर हे भारताचे उद्दिष्ट असून संकटातून संधीकडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य आपल्याला खरे करून दाखवायचे आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेत सांगितले.