Wednesday, April 30, 2025
Homeनाशिकनाशकात ट्रक चोरला नंतर मुंबई-आग्रा महामार्गावर उलटला

नाशकात ट्रक चोरला नंतर मुंबई-आग्रा महामार्गावर उलटला

नाशिक । मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विल्होळी येथे लुटलेला औषधाचा ट्रक चोरटे पळवून नेत असताना नाशिक तालुक्यातील मुंगसरा शिवारात पलटी झाल्याची घटना आज उघडकीस आली.

नाशिककडून मुंबईकडे औषधसाठा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 04-सीए-7764) चोरट्यांनी चालकास गावठी पिस्तूलचा धाक दाखवून रविवारी (दि.22) रात्री विल्होळी शिवारातून पळवला. याप्रकरणी ट्रकचालकाने वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. चोरटे भरधाव ट्रक गिरणारेमार्गे मुंगसरा, दरी, मातोरी रस्त्याने पेठरोडकडे घेऊन जात असताना मुंगसरा शिवारात पलटी झाला.

- Advertisement -

लाखो रूपयांचा औषधसाठा व ट्रक रात्रीपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने सोमवारी (दि.23) ग्रामस्थांंनी नाशिक तालुका पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळा नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येत तपास सुरु केला असता विल्होळी शिवारातून हा ट्रक पळवल्याचे समोर आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नगर अर्बनच्या संगमनेर, बेलापूरसह चार शाखांना टाळे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी चार शाखा 23 मे पासून बंद...