नाशिक : लंडन येथे झालेल्या फुनोकशी शोटोकन जागतिक कराटे स्पर्धेत नाशिक कराटे संघाने घवघवीत यश मिळवले आहे. हि स्पर्धा १३ ते १५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २२ देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
यामध्ये अन्विक्षा इंगळे, फ्रावशी अकॅडमी एक सुवर्णपदक, एक ब्रॉन्झ, आर्यन मराठे, दिल्ली पब्लिक स्कुल, एक ब्रॉन्झ, आकांशा चौधरी, न्यू इरा इंग्लिश स्कुल, दर्शन काळे, न्यू इरा इंग्लिश स्कुल, अनुक्रमे एक ब्रॉन्झ मिळवले आहे.
- Advertisement -
या सर्वांना प्रशिक्षक भारती कायस्थ यांनी मार्गदर्शन केले असून सर्व खेळाडूंचे शिक्षक, पालक तसेच शाळेचे मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले.