मनमाड : येथून जवळ असलेल्या इंडियन ऑयल कंपनीच्या गॅस प्रकल्पात ट्रकखाली चिरडून एका तरुण कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बाटनू पाला वय ३४ रा.कमलापूर, आसाम) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रकल्पात ट्रक मध्ये सिलेंडर लोड करण्याचे काम सुरु असताना ही दुर्घटना झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार कंपनीच्या आत घडल्यामुळे कामगारांच्या सुरक्षे बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान मयत झालेला तरुण हा आसाम येथील असून त्याच्या पाठीशी कोणीही नसल्याने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा या परिसरात होती. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणा करणारे अधिकारी व ठेकेदारा यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे
या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मनमाड पासून सुमारे ७ किमी अंतरावर इंडियन ऑयल कंपनीचा गॅस प्रकल्प असून त्यातून रोज शेकडो ट्रकच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो.
आज सकाळी ट्रक मध्ये सिलेंडर भरण्याचे काम सुरु असताना अचानक वाहना खाली सापडून बाटनू पाला या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा कर्मचारी आर.के ट्रेडर्स यांच्या कडे काम करीत होता. नियमानुसार कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा करण्याची जबाबदारी ही कंपनी आणि ठेकेदाराची असते.
मयत झालेला तरुण हा आसामचा असून त्याच्यामागे कुटुंब आहे त्यामुळे या तरुणाच्या कुटुंबियाला भरपाई देण्यात शिवाय ज्यांच्या हलगर्जीपणा त्याचा मृत्यू झाला त्याच्यवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.