Sunday, May 5, 2024
Homeनाशिक‘त्या’ डॉक्टरांवर रूग्णालयातच उपचार; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडून ट्विटची दखल

‘त्या’ डॉक्टरांवर रूग्णालयातच उपचार; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंकडून ट्विटची दखल

नाशिक : अमेरीकेत असणार्‍या युवकाने करोनाची लागण झालेल्या डॉक्टर वडीलांना घरातच उपचार करून देण्याची विनंती ट्विटद्वारे केली. याची दखल राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत नाशिक जिल्हा प्रशासनाला तशा सुचना करण्यात आल्या.

मात्र तसेच नियमात बसणारे नसल्याने तसेच अशा उपचार पद्धतीबाबत धोरणात्मक निर्णयच झालेला नसल्याने प्रशासनाने नम्र उत्तर पर्यटनमंत्र्यांना देत तुर्तास डॉक्टरवर रूग्णालयातच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जिल्हा रूग्णालयात मध्ये कार्यरत असलेल्या व गंगापूर रोड परिसरातील आकाशवाणी टॉवर परिसरात राहणार्‍या डॉक्टरांचा करोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा रूग्णालयामध्ये तात्काळ दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते.

गेली चार दिवसांपासून व्यवस्थित उपचार सुरू आहेत. मात्र, अमेरिकेत राहत असलेल्या त्यांच्या मुलाने गुरूवारी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करून डॉक्टर पित्याने शासकीय सेवा देत करोना वारियर्स म्हणुन काम केले आहे. सेवा देताना त्यांना करोनाची लागण झाली आहे. जिल्हा रूग्णालयात त्यांना पुरेशा सुविधा मिळणार नसल्याचे सांगत त्यांना घरी कोरोंटाईन करून घरीच उपचार करून देण्याची विनंती केली. तसेच, डॉक्टरांना अत्यंत अल्प स्वरूपाची लक्षणे असून, ते डॉक्टर असल्याने उपचार करण्यात अडचण येणार नसल्याचा दावा केला होता.

आदित्य ठाकरे यांनी या ट्विटची दखल घेऊन तात्काळ नाशिक जिल्हा प्रशासनास विचारणा केली असता संपुर्ण प्रशासन कामाला लागले. तर दुसरीकडे डॉक्टर ज्या परिसरात राहत होते. त्या परिसरातील नागरीकांनी यास तीव्र विरोध करण्यास सुरूवात केली होती.

प्रशासनाने धांडोळा घेतल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतुदींमध्ये करोना पॉझिटिव्ह रूग्णास घरी उपचार करण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही. तसेच यामुळे करोना फैलावाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते.

यामुळे आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनास कळवल्यानंतर नम्रपणे याची माहिती ठाकरे यांना देण्यात आली आहे. यामुळे तुर्तास तरी या डॉक्टरांवर जिल्हा रूग्णालयातच उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या