Tuesday, November 19, 2024
Homeनाशिकपीक पेरा नोंदीसाठी मोबाईल अ‍ॅॅपचा वापर; दिंडोरीसह राज्यातील सहा तालुक्यांचा समावेश

पीक पेरा नोंदीसाठी मोबाईल अ‍ॅॅपचा वापर; दिंडोरीसह राज्यातील सहा तालुक्यांचा समावेश

अजित देसाई । नाशिक
शेतात पेरलेल्या पिकांची सातबारा उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी आता शेतकर्‍यांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपल्या शेतातील लागवड केलेल्या पिकांचे फोटो मोबाईल फोनवरून अपलोड करण्याची सोय ई- पीक पाहणी या ऍपद्वारे होणार आहे.याद्वारे उपलब्धफोटो व स्थानाची पडताळणी केल्यावरपीक पेर्‍याची नोंद तलाठ्यामार्फत करण्यात येणार आहे. राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या मदतीने हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरु केले असून दिंडोरीसह सहा तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर गेल्या वर्षांभरापासून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

राज्यातील शेतकर्‍यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने फेब्रुवारी 2019 मध्ये शासनाने ’ई- पीक पाहणी या मोबाईल ऍपचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याचा निर्णय घेतला होता. टाटा ट्रस्टकडून निर्मित या ऍपद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात लागवड केलेल्या पिकांची सोप्या पद्धतीने स्वतःचनोंदणी शक्य होणार आहे.

- Advertisement -

दिंडोरीसोबतच वाडा (पालघर), अचलपूर (अमरावती), कामठी (नागपूर), बारामती (पुणे), फुलंब्री (औरंगाबाद) या तालुक्यांमध्ये पथदर्शी म्हणून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन फोटो काढून तो ई – पिकपाहणी या ऍपवर मोबाईल फोनद्वारेअपलोड करावा लागणार .या साठी विकसितमोबाइल ऍपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे. अपलोड करण्यात आलेल्या फोटो व स्थानाची तलाठ्याकडून पडताळणी केली जाईल व त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबधित शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर होणार आहे.

लवकरच या मोबाइल ऍपद्वारे पिकांची नोंद घेण्याची पद्धत राज्यात सर्वत्र लागू केली जाणार आहे. हे ऍप महा-भूलेखशी संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फोटो अपलोड करायला घेतल्यावर डिजिटल सातबाराच्या लिंक उघडल्या जातात. ऍप कार्यान्वित करताना शेतकर्‍यांना विशिष्ठ सांकेतिक क्रमांक देऊन त्यांचे प्रोफाइल बनवण्यात येते.

असे प्रोफाइल बनवल्यावर केवळ खाते क्रमांक टाकून गटातील पिकांची माहिती भरता येते. गूगल मॅप सह जिओ टॅगिंगची यासाठी मदत घेतली जात असल्याने चुकीची माहिती भरण्याचा प्रयत्न केल्या ती स्वीकारली जात नाही. अपलोड झालेली माहिती तलाठ्यांच्या डेस्कवर गेल्यावर दोन आठवड्यांच्या आत पडताळणी होऊन सात बारा ला पीक पेरा नोंदवला जातो.

दोन हंगामाची नोंद पूर्ण
गेल्या फेब्रुवारीत दिंडोरी तालुक्यात शासनाने ई-पिकपाहणी ऍपद्वारे पीकपेरा नोंदवण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सांगितले. प्रांताधिकारी संदिप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मदतीने शेतकर्‍यापर्यंत माहिती पोचवण्यात आली. ग्रामसभांचे देखील सहकार्य घेतले. रब्बीचा गेला हंगाम संपत आला होता. त्यानंतरचा पूर्ण खरीप आणि आताचा रब्बी हंगाम सातबारावर नोंदविण्यात आला. यातून तालुक्यातील शेती कसणारे शेतकरी आणि लागवड होणारी पिके यांचा डाटाबेस तयार होण्यास सहाय्य होणार आहे.
-कैलास पवार, तहसीलदार – दिंडोरी

शेतकर्‍यांचा सक्रिय सहभाग
गाव पातळीवरून पीकपेरणी अहवाल व वास्तववादी माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता येणार आहे., पीक अहवाल प्रक्रियेत शेतकर्‍यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे यासाठी पीक पेरणीबाबतची माहिती आवश्यक असते.मोबाइल ऍपद्वारे सात-बारा उतार्‍यामध्ये ही माहितीनोंदवण्याची सुविधा शासनाने टाटा ट्रस्टच्या माध्यमातूनउपलब्ध करून दिली असल्याचे प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक डी. बी. पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या