Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik Political : आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचार रॅलीने मतदारसंघ दुमदुमला

Nashik Political : आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचार रॅलीने मतदारसंघ दुमदुमला

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नाशिक पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचार रॅलीने संपूर्ण मतदारसंघ दुमदुमून गेला. सकाळी मखमलाबाद रोडवरील जॉगिंग ट्रॅकवरून ढिकले यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली. यावेळी जॉगिंग करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ढिकले यांना आशीर्वाद देत त्यांचा सत्कार केला. यानंतर ढिकले यांनी संपूर्ण नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भव्य रॅली काढून मतदारांचे आशीर्वाद घेत प्रचाराची सांगता केली.

- Advertisement -

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून ॲड. राहुल ढिकले हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहे. विकासाचे पर्व मतदारसंघात प्रत्यक्षात उरविल्याने त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून, जनसागर त्यांच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीन सहभागी होत आहे. त्यात प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडल्याने मतदार अजूनच प्रभावित झाले आहे. सर्वसामान्य मतदारांना आपला आमदार नेमके काय काम करतो हेच माहित नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास होताना दिसत असतो. मात्र, राहुल ढिकले यांनी विकास पर्व नावाने कामांची सचित्र यादीच मतदारांच्या हाती दिली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात ॲड. ढिकले यांनी मतदार संघासाठी कोणकोणती विकासकामे केली हे जनतेसमोर आले आहे.

या रॅलीमध्ये येऊन येऊन येणार कोण, राहल ढिकलेंशिवाय आहेच कोण, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणांनी यावेळी प्रचारात रंगत आली. केंद्रात भाजपची सत्ता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला भरीव निधी आणण्यासाठी तसेच सिंहस्थाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी राहुल ढिकले यांना पुन्हा आमदार करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार यावेळी विविध परिसरातील मतदारांनी व्यक्त केला. ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ दसक गावापासून सकाळी ९ वाजता करण्यात आला. ही रॅली बिटको प्रचार कार्यालय येथे या भव्य रॅलीचा समारोप करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...