सिन्नर : पुतण्याचे जेवणाचे खरकटे ताट घुतले नाही म्हणून पती व सासूने महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पालवेवाडी (दापूर) येथे घडली.
- Advertisement -
संगिता ज्ञानेश्वर पालवे (२९) असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पती ज्ञानेश्वर व सासू भीमाबाई पुंडलिक पालवे यांनी पुतण्याचे जेवणाचे ताट धुतले नाही म्हनून शिवीगाळ करून संगिताला फावड्याचा दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत संगिता यांना हाताला व पाठीला दुखापत झाली.
याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.