Monday, November 25, 2024
Homeदेश विदेशमुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा; अवघ्या १५ महिन्यातच सरकार कोसळले

मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा; अवघ्या १५ महिन्यातच सरकार कोसळले

नवी दिल्ली : मध्य प्रदेश मध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी ठरले असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आजच्या बहुमत चाचणी विश्वासदर्शी ठरावाच्या आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काहीच वेळात कमलनाथ राज्यपाल लालजी टंडन यांना भेटुन आपला राजीनामा देतील. कमलनाथ यांना अवघ्या १५ महिन्यातच राजीनामा द्यायला लावल्याने भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

काँग्रेसचे युवा फळातील नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ९ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्यासोबतच अन्य २२ आमदारांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती, त्यांनतर हे संपूर्ण मध्ये प्रदेश राजकीय नाट्य सुरु झाले. कमलनाथ यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला मध्य प्रदेश मध्ये काम करण्यासाठी केवळ १५ महिने मिळाले.

- Advertisement -

दुसरीकडे भाजपवर हल्लाबोल करताना हातात १५ वर्षे सत्ता असूनही भाजपने राज्यात काम केले नाही आणि आता ते मला मिळालेल्या जनतेच्या बहुमताचा सुद्धा अपमान करत आहेत, ते लोकशाहीचा अपमान करत आहेत याचा खेद व्यक्त केला.

मध्य प्रदेशच्या जनतेला हरवून भाजप जिंकण्याचा प्रयत्न करत आहे मात्र असं कधीच होणार नाही याची मी खात्री देतो, कारण आज नंतर उद्या आणि उद्या नंतर परवा नक्कीच येईल तेव्हा भाजपचे खोटेपण सिद्ध होईल अशा तीव्र शब्दात कमलनाथ यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या