Friday, May 3, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्यांच्या ठेकेदार अधिकार्‍यांत व कृती समितीच्या कार्यकर्त्यांत वादावादी

निळवंडे कालव्यांच्या ठेकेदार अधिकार्‍यांत व कृती समितीच्या कार्यकर्त्यांत वादावादी

निळवंडे (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या पाहणी दौर्‍यावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर आले असता निळवंडे पाटपाणी कृती समितीचे कार्यकर्ते हजर होते. कामाची गती अतिशय संथ असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी कोहिरकर यांच्या लक्षात आणून देत असताना नेहमीप्रमाणे कंपनीच्या अधिकार्‍यांकडून विविध कारणे सांगितली जात होती.

यावेळी कारणे सांगू नका कामे करा असे समितीच्या कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक कोहिरकर व कार्यकारी अभियंते भरत शिंगगाडे यांच्यासमोरच निब्रळ येथे कंपनीच्या अधिकार्‍यांमध्ये व समिती कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. कोहिरकर व शिंगगाडे यांच्या मध्यस्थी नंतर यावर पडदा टाकण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या