व्यापार्याची 13 लाखांना फसवणूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती कांदा मार्केट येथील एका व्यापार्याचा 24 टन 240 किलो कांद्याची तिघांनी परस्पर विल्हेवाट लावून 13 लाख सहा हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रविवारी (दि. 5) नगर तालुका पोलीस ठाण्यात रवींद्र बद्रिनाथ म्हस्के (रा. गोगलगाव ता. नेवासा), मुन्नाभाई एजंट (रा. कोठला, नगर) व निजाम शेख (रा. केडगाव) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी नानासाहेब उर्फ राजेंद्र चंद्रभान आवारे (वय- 41 रा. सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र आवारे नेप्ती मार्केट येथेल कांदा खरेदीचे व्यापारी आहेत. त्यांनी शेतकर्यांकडून खरेदी केलेला 13 लाख सहा हजार 500 रुपये किंमतीचा 24 टन 240 किलो कांदा 29 डिसेंबरला रवींद्र म्हस्के, मुन्नाभाई एजंट व निजाम शेख यांनी आवारे यांना विश्वासात न घेता परस्पर विल्हेेवाट लावली. याचा मोबदला आवारे यांना मिळाला नसल्याने त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जारबाल करत आहेत.