Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रबोईसर : केमिकल कंपनीत भीषण स्फोट; मालकासह आठ कामगारांचा मृत्यू

बोईसर : केमिकल कंपनीत भीषण स्फोट; मालकासह आठ कामगारांचा मृत्यू

पालघर । जिल्ह्यात बोईसर येथे तारापूर एमआयडीसीत शनिवारी सायंकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात ८ जण मृत्युमुखी पडले आहेत तर काही जण भाजले आहेत. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला. मृतांमध्ये कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे. स्फोटाच्या हादर्‍यामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली आहे. काही कामगार ढिगार्‍याखाली अडकले आहेत. दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बोईसर औद्योगिक वसाहतीमधील एम-2, या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास सुमारास भीषण स्फोट झाला आहे. हा कारखाना या पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखला जात होता, या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत देखील कोसळली आहे, या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या स्फोटाचा आवाज 22 ते 25 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. स्फोटामुळे लागलेली आग आसपासच्या दोन-तीन कंपन्यांपर्यंत पसरली आहे. मृतांमध्ये, कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांचाही समावेश आहे. तारापूर गावातील कोलवडे गावात ही कंपनी आहे. कंपनीचे नाव ‘तारा नायट्रेट’ आहे. काही कामगार अद्याप इमारतीखाली दबले असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांचे बचाव कार्य सुरू आहे. या स्फोटानंतर औद्योगिक परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता .या...