Sunday, May 5, 2024
Homeनगर‘माध्यमिक’ साठी 242 उमेदवारी अर्ज दाखल

‘माध्यमिक’ साठी 242 उमेदवारी अर्ज दाखल

आज शेवट : ऐनवेळी किती पॅनल होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष

अहमदनगर (वार्ताहर)- जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. आज (शुक्रवारी दि.10) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सोसायटीचे दि.9 फेब्रुवारीला मतदान होणार असून अर्ज दाखल करण्यास सोमवार (दि.6) पासून सुरुवात झाली. आतापर्यंत सत्ताधारी पुरोगामी आणि विरोधी परिवर्तन मंडळाच्या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गुरूवारी दुपारी तीनपर्यंत विक्रमी 242 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक पदांच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार तालुक्यातील शिक्षक नेत्यांनी कंबर कसली असून बैठका, मेळावे, मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या आघाडी विरोधात परिवर्तन सेवा मंडळ सध्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. सत्ता धार्‍यासमोर नेमक्या किती आघाड्या मैदानात उतरतील ते अर्ज माघारीपर्यंत स्पष्ट होईल.

गेल्या सतरा वर्षांपासून पुरोगामी सहकार मंडळाने प्रा. कचरे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता टिकऊन ठेवली आहे. मात्र मागील निवडणुकीत विरोधी परिवर्तन मंडळाचे पाच संचालक निवडून आले. यावेळीही दोन्हीही मांडळे एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. मागील वेळी उमेदवारी न मिळालेल्या काही उमेदवारांनी एकत्र येत तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी किती पॅनल तयार होतील, याचे चित्र अर्ज माघार घेई पर्यंत स्पष्ट होईल.

दरम्यान, उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून यावेळी मोठ्या संख्याने उमेदवारी दखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 21 संचालकांच्या जागेसाठी 242 उमेवादी अर्ज दाखल असून आज मोठ्या संख्याने उमदेवारी अर्ज दाखल होणार आहे. यामुळे यंदा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडीत विक्रमी उमेदवार असणार आहेत.

काही दिगग्जांचे अर्ज
अ ) परिवर्तन सेवा मंडळ
आप्पासाहेब शिंदे (राहुरी)
शिरीष टेकाडे (नगर तालुका)
उद्धव गुंड (नगर शहर)
महेंद्र हिंगे (नगर तालुका)
बाळासाहेब राजळे (पाथर्डी)
सुनील दानवे (नेवासा )
ब ) पुरोगामी आघाडी
कैलास रहाणे (संगमनेर)
धनंजय म्हस्के (नगर शहर)
भाऊसाहेब कचरे (नगर तालुका)
कल्याण ठोंबरे (नगर तालुका)

निवडणूक कार्यक्रम
अर्ज छाननी- 13 जानेवारी
अर्ज मागे- 14 ते 28 तारीख
निशाणी व अंतिम उमेदवारी यादी-29 जानेवारी
मतदान- 9 फेब्रुवारी
मतमोजणी- 10 फेब्रुवारी

- Advertisment -

ताज्या बातम्या