Friday, May 3, 2024
Homeनगरशिरसगाव उपबाजार आवारात हवाला व्यवहार !

शिरसगाव उपबाजार आवारात हवाला व्यवहार !

शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता : बाजार समितीकडून कारवाईची अपेक्षा

तळेगाव मळे (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव उपबाजार समिती म्हणून उदयाला आले आहे. उपबाजार समिती म्हणून दर्जा मिळाल्यामुळे शिरसगाव उपबाजार आवारात शेतकर्‍यांनी विक्रीस आणलेल्या शेतमाल रोख पैसे न देता 15 ते 20 दिवसानंतर पैसे देण्याच्या बोलीवर चढ्या भावाने खरेदी केला जातो. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे कोपरगाव बाजार समितीच्या काही व्यापार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘सार्वमत’शी बोलताना सांगितले.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोपरगाव कृषी उत्पन बाजार समितीने नव्याने उपबाजार आवार सुरू केला आहे. या उपबाजार आवारात परिसरातील शेतकरी सोयाबीन, मका, बाजरी, कडधान्य विक्रीसाठी आणतात. मात्र विक्रीसाठी आणलेल्या या मालाचे रोख पैसे न देता शेतकर्‍यांना 15 ते 20 दिवानंतर पैसे मिळतील असे सांगून त्यांचा माल चढ्या भावाने खरेदी केला जातो. जास्त भाव मिळत असल्याने शेतकरीही याकडे आकर्षीत होत आहे.

मात्र या शेतकर्‍यांची फसवणूक झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता कोपरगाव बाजार समितीच्या व्यापार्‍यांमधून उपस्थित होत आहे. बाजार समिती प्रशासनाने यावर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. दरम्यान उपबाजार आवारात हवाला व्यवहार करणारे व्यापारी कोण हे बाजार समिती प्रशासनाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, असा सूर दबक्या आवाजात निघत आहे. दरम्यान उपबाजार आवारात चढ्या भावाने खरेदी होत असल्याने कोपरगाव बाजार आवारातील व्यापार्‍यांना व्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्याचीही चर्चा व्यापारी वर्गात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या