Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपुरात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार : प्रातांधिकारी

श्रीरामपुरात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार : प्रातांधिकारी

किराणा दुकान, बाजार समिती, औषधांची दुकाने बंद राहण्याची अफवा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर व तालुक्यात सर्व अत्यावश्यक सेवा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार नेहमीप्रमाणे सुरूच राहणार आहेत. कुणीही गोंधळून जाऊ नये, असे आवाहन प्रातांधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

किराणा दुकान, मेडिकल स्टोअर पुढील तीन दिवस बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे अनेकांनी किराणा दुकाने आणि भाजीपाल्याच्या दुकानात गर्दी केली होती.

या संदर्भात प्रातांधिकारी पवार आणि तहसीलदार पाटील यांच्याशी संपर्क केला असता अशा प्रकारची कोणतीही सूचना/ आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार नेहमीप्रमाणे सुरूच राहणार आहेत असे स्पष्ट केल्याने श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

बाजार समितीही तीन दिवस बंद राहणार असल्याची अफवा होती. यासंदर्भात संपर्क साधला असता बाजार समितीतील व्यवहार सुरूळीत सुरू राहणार आहेत. तसेच कांद्याचे लिलाव आठवड्यातून दोन दिवस केले जात होते. ते आता रोज केले जाणार आहेत. फक्त शेतकर्‍यांनी गर्दी करू नये असे आवाहन श्रीरामपूर बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या