नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड मध्ये पहिला वनडे सामना होत असून न्यूझीलँडला विजयासाठी ३४८ धावांची आवश्यकता आहे.
दरम्यान सुरवातीला न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत ४ विकेट्स गमावून ३४७ धावा केल्या आणि यजमान संघाला पहिला वनडे जिंकण्यासाठी ३४८ धावांचे लक्ष्य दिले. पहिले फलंदाजी करत टीम इंडियासाठी चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यर याने शतकी कामगिरी केली.
- Advertisement -
या सामन्यात श्रेयस अय्यरने १०१ बॉलमध्ये पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले. मात्र, तो १०३ धावांवर बाद झाला. श्रेयसने केएल राहुल सह शतकी भागीदारी करत भारताचा डाव सर्वाला आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले.