Friday, June 26, 2026
Homeनाशिकईद निमित्त मुस्लिम बांधवांनी केली देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना

ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी केली देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पवित्र ईद अल अज्हा निमित्त आज सकाळी दहा वाजता शहरातील ऐतिहासिक शाहजानी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण झाले . यावेळी देशाच्या प्रगतीसाठी तसेच शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता. हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित सामुदायिक नमाज पठण ईदगाह मैदानावर केले. खतीब ए नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजचे नेतृत्व केले.

- Advertisement -

यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, उपायुक्त प्रशांत बच्छाव तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष आरिफ काजी, युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी स्वप्निल पाटील आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील सुमारे ५० विविध मशिदी मध्ये सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान नमाज पठण झाले.

मुख्य सोहळा ईदगाहवर झाल्यानंतर मुस्लिम बांधव कुर्बानी दिली. दरम्यान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुत भागात धार्मिक वातावरण पाहायला मिळाले. मुस्लिम बांधवांनी डोक्यावर इस्लामी टोपी घालून इबादत केली. महिलांनी घरात नमाज पठण केले. दुपारनंतर शहरातील बडी दर्गा शरीफसह विविध दर्गा शरीफ तसेच कब्रस्तान या ठिकाणी फातेहा पठण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

अन पॅलेस्टाईनचा ध्वज फडकला
सकाळी ईदची विशेष सामुदायिक नमाज इंदगाह मैदानावर शाततेत पठण झाल्यानतर अचानक मैदानावर एकाने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावल्याने त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. पॅलेस्टाईनचा झेंडा सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान पोलिसानी देखील याची दखल घेतली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ जून २०२६ – एवढी हिंमत येते तरी कुठून?

0
माणसाच्या मनातील संवेदनशीलता, नैतिक मूल्ये आणि कायद्याचा धाक किती टोकाच्या पातळीवर जाऊन संपू शकतो, याचे एक मन विषण्ण करणारे आणि समाजमानाला पोखरून काढणारे वास्तव...