नाशिक : एखाद्या चित्रपटातील प्रसंग डोळ्यासमोरून तरळून जावा असा प्रसंग एका आजीबाईच्या बाबतीत घडला आहे. तेलंगणातील भूपलपल्ली येथील जिल्हाधिकारी आवारात हा सुखावणारा प्रसंग घडला आहे.
भूपलपल्ली येथील आजीबाई आपल्या पेन्शनच्या प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जातात. यावेळी जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयाकडे येतात. त्यावेळी त्यांना हि आजीबाई कार्यालयाच्या पायऱ्यावर हात जोडून बसलेली दिसते. जिल्हाधिकारी थांबून जवळच्या शिपायाला आजीबाईंबद्दल विचारतात परंतु शिपायाला काहीच माहिती नसते. त्यावेळी जिल्हाधिकारी स्वतः त्या आजीबाई शेजारी पायऱ्यावर बसतात.आजीला विचारतात काय अडचण आहे. आज्जी सांगते दोन वर्षांपासूनची पेंशन भेटली नाही.
यावेळी जिल्हाधिकारी आजीबाईंकडून कागदपत्र मागतात. आजीने जमवलेली सगळे कागदपत्र जिल्ह्धिकाऱ्यांच्या हातात ठेवते. आणि सोबत तिला झालेला सगळा त्रास विनंती वजा तक्रार स्वरूपात सांगते. कार्यालयातील लोकांनी किती त्रास दिला किती चकरा मारल्या याचा सगळा लेखाजोखाच आजीबाई जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडते.
जिल्हाधिकारी आजीबाईचे सगळे कागपत्र व्यवस्थित तपासून आजींना थांबण्यास सांगतात. जिल्हाधिकारी लागलीच सबंधित अधिकाऱ्याला तात्काळ हजर राहण्याचे आदेश देतात.तो अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित होतो.अन काही वेळात त्याच पायऱ्यांवर त्या म्हातारीच्या दोन वर्षांपासूनचा रखडत असलेला पेंशनचा प्रश्न सुटतो. अशा संवेदनशील जिल्हाधिकाऱ्याचे नाव अब्दुल अझीम.
शेवटी कुठल्या पदावर कोण व्यक्ती आहे यापेक्षा त्या पदावरील ती व्यक्ती किती संवेदनशील आहे हे महत्वाचं आहे.