पोटचेस्टरूम : आयसीसी अंडर-१९ विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनल होत आहे. पहिल्या डावात पाकिस्तान संघाने ४३.१ षटकात १७२ धावा केल्या आहेत. भारतापुढे १७३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
पोटचेस्टरूम येथे हा उपांत्य सामना होत आहे. अंडर-१९ विश्वचषकच्या पहिल्या सेमीफाइनल सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने ४३.१ ओव्हरमध्ये १७२ धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य दिले. भारताने ४ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. साखळी सामन्यात एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघाला सलग पाचवा सामना जिंकण्याची संधी मिळणार आहे.
सुशांत मिश्रा याने भारताकडून ३, रवी बिश्नोई आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यशस्वी जयस्वाल, अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसरीकडे, पाकिस्तानकडून सलामी फलंदाज हैदर अली आणि कर्णधार रोहेल नजीर यांनी अर्धशतकी खेळी केली. मुहम्मद हारिस याने २६ धावांचे योगदान दिले, हैदर अली ५६ आणि कर्णधार नजीरने ६२ धावा केल्या.
सलिल परांजपे, देशदूत नाशिक