Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशलॉरेन्स बिश्नोईच्या गँगनेच…; सलमान खानचा जबाबात धक्कादायक खुलासा

लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनेच…; सलमान खानचा जबाबात धक्कादायक खुलासा

मुंबई | Mumbai
अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने स्वत: असा जबाब नोंदवला आहे की, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मारण्यासाठीच लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या घराबाहेर गोळीबार घडवून आणला असे त्याला वाटते.

एका खासगी वृत्तवाहीनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खानच्या घरावरील फायरिंग प्रकरणात मुंबई पोलीस क्राइम ब्रांचकडून चार्जशीट दाखल करण्यात आली होती. यामध्ये सलमानने पोलिसांना दिलेल्या माहितीचाही समावेश करण्यात आला होता. ही घटना घडली तेव्हा सलमान कुठे होता? तो काय करत होता? याबाबत अभिनेत्याने ४ जूनला पोलिसांकडे जबाब नोंदविला होता. त्याबाबत आता माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने सांगितले की, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरोधात पुरेशी नोंद आहे. आरोपींवर इतरही अनेक गुन्हे दाखल आहे. याप्रकरणी आता अजून तपासणी सुरु आहे.

YouTube video player

सलमानने १४ एप्रिल रोजी गोळीबारावेळी नेमके काय घडले याविषयी सविस्तर तपशील दिला. त्याने असे म्हटले की, ‘मला फटाके फोडल्यासारखा आवाज आला. साधारण पहाटे ४.५५ वाजता पोलीस सुरक्षारक्षकाने सांगितले की २ बाइकस्वारांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीवर गोळीबार केला. याआधीही त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला दुखापत करण्याचा प्रयत्न केला आहे. मला अशी माहिती मिळाली की सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोईने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे माझा असा विश्वास आहे की, लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनेच माझ्या बाल्कनीमध्ये गोळीबार केला आहे’.

सलमान पुढे म्हणाला की, माझ्या बॉडीगार्डकडून या घटनेबाबत १४ एप्रिलला FIR दाखल करण्यात आला होता. लॉरेन्स आणि त्याच्या भावाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. याआधी एका मुलाखतीत त्याने मला आणि कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली होती. मला माहीत आहे की लॉरेन्स बिश्नोईनेच हा हल्ला घडवून आणला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना संपवण्याचा त्याचा प्लॅन होता. त्यासाठीच त्याने हा कट रचला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी...

0
मुंबई । Mumbai राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल...