Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचारी निलंबित

Ahilyanagar : एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचारी निलंबित

‘ग्रो मोअर’च्या आरोपीकडून 1.5 कोटी ऑनलाईन घेतल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’ कंपनीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपीकडून पोलिसांनी 1 कोटी 50 लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढले आहेत.

- Advertisement -

ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तपासादरम्यान, प्रमुख संशयित आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याला अटक करण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने शेअर बाजारातील नुकसानीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करता न आल्याचे सांगितले. मात्र, पुढील खुलास्यात त्याने पोलिसांनी पैसे घेतले असल्याचा आरोप केला आहे.

YouTube video player

भूपेंद्र सावळेने दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 जानेवारी 2025 रोजी नाशिककडे जात असताना, एलसीबीचे उपनिरीक्षक तुषार धाकराव व तीन कर्मचार्‍यांनी त्याला लोणीजवळ अडवले. आरबीआय लायसन्सशिवाय गुंतवणूक घेतल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्याकडून 1.5 कोटी रुपये मागितल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला. तसेच, आरोपीने दावा केला की, त्याला आणि त्याच्या भावांना जबरदस्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले व तेथेच एका विशिष्ट बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. ही संपूर्ण रक्कम उपनिरीक्षक धाकराव यांनी दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचे तो म्हणाला.

दरम्यान, या आरोपांची गंभीरता लक्षात घेता उपनिरीक्षक धाकराव, कर्मचारी मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोडे हे करीत आहेत. दरम्यान, गुन्ह्याचा तपास भरकटवण्यासाठी संशयित आरोपीने पोलीस तपासात ही माहिती दिली असल्याचा अंदाज काही पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी...

0
मुंबई । Mumbai राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल...