Friday, May 17, 2024
Homeधुळेसोनपोत पळविणाऱ्या दोघांना दोन तासात घातल्या बेडया

सोनपोत पळविणाऱ्या दोघांना दोन तासात घातल्या बेडया

धुळे – dhule

शहरातील देवपूर (Devpur) भागातील सुयोग नगरात भर दिवसा महिलेला फाईटरने मारत सोनपोत पळविणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सोनपोतसह दुचाकी व दोन मोबाईल असा 89 हजारांचा मुद्द्यावर हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

एलसीबीच्या या जलदगती तपासाचे पोलीस अधीक्षकांनी (Superintendent of Police) कौतुक केले आहे. शोभा नंदकिशोर निकम (वय 49 रा. प्लॉट नं. 89, सुयोग नगर, देवपूर, धुळे) या काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घराजवळून पायी जात होत्या. त्यादरम्यान मागून दुचाकीवर आलेल्या 30 ते 32 वयोगटातील दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. मागे बसलेले इसमाने त्यांच्या उजव्या खांद्यावर फाईट मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील एक तोळे वजनाची मंगल पोत जबरीने काढून घेत पसार झाले.

याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात (police) दोघा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्ह्याची पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी तत्काळ दखल घेतली. आरोपीतांचा शोध

घेवून कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले. त्या अनुषंगाने माहिती प्राप्त करीत असतांना हा गुन्हा करण ऊर्फ अक्षय संजय कांबळे (वय 23 रा. शनी नगर, साक्री रोड, धुळे) याने त्याचा साथीदार दिपक भास्कर ईदाईस (वय 28 रा.भिमनगर, धुळे) याच्यासह केला असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ पथकास कारवाईसाठी रवाना केले.

पथकाने साक्री रोड परीसरातून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेली सोन्याची पोत सुनिता आनंद केदार (रा.यशवंत नगर. साक्री रोड धुळे) हिच्या ताब्यात दिली. तीने ती पोत श्रीजी ज्वेलर्स, आग्रा रोड, धुळे येथील भरत कल्याण जडे यांना २५ हजार ५०० रुपयांना विक्री केल्याचे सांगितले. दरम्यान दोघांकडून तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१८ बी.यु. ५०४७), २२ हजार ४०० रुपये रोख, १२ हजारांचे दोन मोबाईल असा एकुण ६४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर भरत कल्याण जडे यांनी सुनिता केदार यांनी विक्री केलेली २५ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची पोत आणून दिली. तसेच सुनीता आनंद केदार व भरत कल्याण जडे यांना गुन्हयाचे तपासासाठी पश्चिम देवपुर पोलीस ठाणे येथे हजर राहण्याची नोटीस देण्यात आली असून त्यांचा गुन्हयातील सहभाग तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तर दोघां आरोपींना पश्चिम देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ संदीप सरग, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, श्रीशैल जाधव, योगेश जगताप, किशोर पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या