मुंबई। Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. आता राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु अद्यापही विरोधी पक्षनेते पद जाहीर झालं नाही. यातच संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे जाणार असून लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. अनेक मातब्बर नेत्यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनीही विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू ठोकला आहे. तब्बल ३० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून त्यांच्या सह्यांचे पत्र त्यांनी काँग्रस हायकमांडला पाठविले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यानंतर गेल्या २ दिवसांपासून काँग्रेस दुसऱ्या फळीतील नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता असल्याचे बोलले गेले. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.
भाजपानं भाकरी फिरवली! राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नव्या टीमची घोषणा.. कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी?
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज विधानसभेत बैठक होणार आहे. त्यामुळे आज या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी संग्राम थोपटे यांनी पाठवलेल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय निर्णय घेणार हेदेखील पाहावे लागणार आहे असं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.
आ. संग्राम जगताप समर्थक विधाते, खोसे पक्षातून बडतर्फ