Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकPolitical : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; म्हणाले…

Political : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; म्हणाले…

मुंबई । प्रतिनिधी Mumbai
विधानसभेतील पुरेशा संख्याबळाच्या अभावी विरोधी पक्षनेतेपद मिळण्यात नियमाचा अडथळा असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिल्ली विधानसभेचा दाखला दिला आणि विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली. तसेच विधानसभा उपाध्यक्ष पदही विरोधी पक्षाला देण्याची मागणीही या नेत्यांनी केली.

हे देखील वाचा – देशदूत ई-पेपर ८ डिसेंबर २०२४

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला असून विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार देखील आघाडीतील एका पक्षाचे निवडून आले नाहीत. त्यामुळे आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे किंवा कसे याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष करतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली आहे.

हे देखील वाचा– Eknath Shinde : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले…

उद्या,सोमवारी विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावे असा प्रस्ताव फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव ठेवला. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...