Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले…

Eknath Shinde : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले…

मुंबई । Mumbai

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळूनही आम्हाला कमी जागा मिळाल्या, असा दावा करणाऱ्या शरद पवारांना उपमुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले, या पूर्वी झारखंडमध्ये मतदान झालं, कर्नाटकात झालं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्या. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा दुटप्पीपणा आहे.

तसेच, विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिलाले नाही. मी आधीच म्हणालो विरोधी पक्षाला लाडकी बहीण चारीमुंड्या चित करेल. सर्व घटकांनी या राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. जनता घरी बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना मतदान करतात, एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी म्हणालो होतो, विरोधी पक्षाला या देशाची जनता चारी मुंड्या चीत करेल. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ, या राज्यातील सर्व घटकांनी विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. फिल्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात. हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या