Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीचे नेते बंडखोरीच्या पवित्र्यात  

Maharashtra Politics : महायुतीचे नेते बंडखोरीच्या पवित्र्यात  

उमेदवारीसाठी इच्छुकांची आघाडीकडे चाचपणी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabah Election) पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने महायुतीत (Mahayuti) विशेषतः भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँगेसमधील स्थानिक नेते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. या नेत्यांनी उमेदवारीसाठी आघाडीकडे चाचपणी सुरु केली आहे. आघाडीकडून विधानसभा उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतर हे नेते महायुतीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिली थेट तिसऱ्या आघाडीसाठी ऑफर

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटणार असला तरी आतापासूनच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यादृष्टीने आघाडी आणि महायुतीकडून तयारी सुरु आहे. अजित पवार गटाने सन्मान यात्रेच्या निमित्ताने उमेदवार (Candidate) घोषित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघातील इच्छुक वेगळा निर्णय घेऊ लागले आहेत. त्याचा प्रत्यय भाजपाला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात आला. येथे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घाटगे यांचा शरद पवार गटातील (Sharad Pawar Group) प्रवेश सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होत आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

कागलप्रमाणे नजीकच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) इंदापूर, वडगावशेरी, मावळ,वाई उत्तर महाराष्ट्रातील कोपरगाव, मराठवाड्यातील देगलूर, आष्टी, विदर्भातील गोंदिया, अहेरी, अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघात महायुतीला धक्के बसण्याची दाट शक्यता आहे. इंदापूरमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उघडपणे अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द अजित पवार गटाकडून पाळला जाण्याची शक्यता नसल्याने भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. पाटील हे इंदापूर विकास आघाडी किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात.

हे देखील वाचा : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

महायुतीत मावळ, अकोले, वडगावशेरी, वाई अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ अजित पवार गटाला मिळणार आहेत. त्यामुळे येथील भाजपचे संभाव्य इच्छुक अस्वस्थ आहेत. मावळमधून भाजपचे माजी आमदार संजय भेगडे यांनी मतदारसंघ भाजपला मिळावी, अशी मागणी केली आहे. अकोले (जि. अहमदनगर) येथील पिचड पिता-पुत्र पुन्हा पवार गटाच्या वाटेवर आहेत. सध्या भाजपचे (BJP) वाईतील मदन भोसले, कोपरगावमधील कोल्हे कुटुंब यावेळी हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :  केंद्र सरकारची मोठी घोषणा! लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे; केंद्रीय गृहमंत्री शाहांची माहिती

मराठवाड्यातील आष्टी, देगलूर मतदारसंघातही भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहेत. या दोन्ही जागा सध्या अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसकडे आहते. देगलूरचे काँग्रेसचे (Congress) विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांची देगलूरची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले आणि माजी आमदार सुभाष साबणे हे अन्य पर्यायाच्या शोधात आहेत. साबणे हे सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. विदर्भात गोंदियाची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने माजी आमदार गोपालदास अगरवाल पुन्हा काँग्रेस घरवापसीच्या तयारीत आहेत अर्जुनी मोरगाव, अहेरी हे मतदारसंघही भाजपसाठी डोकेदुखीचे ठरणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या