Saturday, November 23, 2024
Homeनगरविधानसभेसाठी ‘जुळवाजुळव’ सुरू

विधानसभेसाठी ‘जुळवाजुळव’ सुरू

प्रशासनाकडून अधिकारी-कर्मचारी नियुक्तीसाठी प्राथमिक तयारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधानसभा निवडणूका निर्धारित वेळेत होतील, असे गृहीत धरून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक शाखेने तयारी सुरू केली आहे. मतदानासाठी आवश्यक असणारे यंत्रे सज्ज केल्यानंतर आता निवडणूक विभाग मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणार्‍या मनुष्यबळाची जुळवाजुळव करतांना दिसत आहेत. विधानसभेच्या 12 जागांसाठी साधारणपणे 18 ते 19 हजार कर्मचाररी आवश्यक असून 10 टक्के राखीव असे 20 ते 21 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक होणार आहेत. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने विधानसभा मतदारसंघनिहाय कर्मचारी-अधिकार्‍यांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. महिनाअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 12 मतदारसंघ आहेत. याठिकाणी रचनेनूसार एकूण 3 हजार 763 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी 1 केंद्र अध्यक्ष, 3 पोलिंग ऑफिर्स आणि 1 शिपाई अशा पाच अधिकारी- कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 18 ते 19 हजार कर्मचारी यांच्या आवश्यकता राहणार असून 10 टक्के राखीव असे 20 ते 21 हजार कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखा याबाबत मतदारसंघनिहाय माहिती संकलित करत असून बदलून गेलेले कर्मचारी आणि मतदारसंघात नव्याने आलेल्या कर्मचार्‍यांची माहिती घेण्यात येत आहेत. विशेष करून बदली झालेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक शिक्षकांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांची नव्याने माहिती संकलित करण्यात येत आहे.

तालुकापातळीवरून विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती संकलित झाल्यावर त्यांची सळमिसळ करून एका तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी हे दुसर्‍या तालुक्यात अथवा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेसाठी धाडण्यात येणार आहेत. तत्पूर्वी नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचार्‍यांना राज्य निवडणूक आयोग यांच्यावतीने निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके नेमण्यात येणार आहेत. यात भरारी पथकांसमवेत व्हिडीओ चित्रिकरण करणार्‍या पथकांचा समावेश असून दिवसा आणि रात्री स्वतंत्र अशी प्रत्येकी तीन पथकांचा समावेश राहणार आहे. ही पथके निवडणुकीच्या हालचालीवर करडी नजर ठेवणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात येत आहे.

तहसीदारांना प्रशिक्षण
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तहसीलदारांचे प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. बॅचनूसार हे प्रशिक्षण सुरू असून प्रांताधिकारी यांना लोकसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला गरज वाटल्यास पुन्हा दिल्लीला हे प्रशिक्षण होवू शकते, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

दिवाळीनंतर विधानसभेचा बार ?
यंदा 31 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सणाची धामधूम आहे. या कालावधीत निवडणूकीसाठी मतदान वा मोजणी होण्याची शक्यता कमी आहे. हरियाणा राज्यातील निवडणूक तेथील एका स्थानिक सणामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकल्या आहेत. यामुळे यंदा राज्यात दिवाळीपूर्वीचे पाच दिवस आणि दिवाळीनंतरचे पाच दिवस या कालावधीत निवडणुक टाळली जाईल, अशी शक्यता कमी आहे. दिवाळीच्या सुट्टीत निवडणुकीची कामे आल्यास त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीनंतर म्हणजेच 10 ते 20 नाव्हेंबरनंतर मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या