Friday, October 18, 2024
Homeनाशिकविधान परिषद निवडणूक निकाल : महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार...

विधान परिषद निवडणूक निकाल : महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

- Advertisement -

यात महायुती कडून भाजपाचे पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत असे पाच उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे राजेश विटेकर शिवाजीराव गर्ज असे दोन उमेदवार, शिवसेना (एकनाथ शिंदे ) भावना गवळी,कृपाल तुमणे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी भाजपच्या पाचही उमेदवारांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या दोन उमेदवारांचा, तर शिवसेना (एकनाथ शिंदे )गटाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.

यात पंकजा मुंडे यांना २६ मते, योगेश टीळेकर यांना २६ मते, परिणय फुके यांना २६ मते, तर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना २६ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे राजेश विटेकर यांना २३, शिवाजीराव गर्ज यांना २४ मत मिळाली आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे ) भावना गवळी यांना २४, तर कृपाल तुमणे यांना २५ मत मिळाली आहेत. यात महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार यात विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीचे काँग्रेस कडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मिलिंद नार्वेकर,शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

यात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना २५ मते मिळाली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मिलिंद नार्वेकर यांना २४ मते मिळाली असून महाविकास आघाडी कडून निवडणुकीत रिंगणात असलेले ३ पैकी २ उमेदवारांचा विजय झाला आहे.

यात महाविकास आघाडी कडून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील पाटील यांना केवळ १२ मते मिळाल्या मुळे त्यांना निवडणुकीत पराभव झाला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या