Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याविधिमंडळाची पंचायतराज समिती आज जिल्हा दौर्‍यावर

विधिमंडळाची पंचायतराज समिती आज जिल्हा दौर्‍यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधिमंडळाची पंचायतराज समिती ( Legislature’s Panchayat Raj Committee ) जिल्हा दौजयावर असून, समितीतील सदस्यांचे बुधवारी (दि.25) नाशकात आगमन झाले आहे. आज गुरूवारी जिल्हा परिषदेत समितीचे आगमन होऊन सभागृहात आढावा घेतला जाईल. यासाठी गेल्या दोन आठवडयांपासून जिल्हा परिषदेच्या ( Nashik Zilla Parishad ) विविध भागात जय्यत तयारी सुरू आहे. अधिकारी-सेवकांची धावपळ सुरू होती.

- Advertisement -

दरम्यान, समितीतील काही सदस्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी जि.प. च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच विधानमंडळाने गठित केलेली पंचायतराज समिती नाशिक जिल्हा परिषद दौर्‍यावर येत आहे. दि.26 ते 28 ऑगस्ट असे तीन दिवस समिती जिल्हयात आहे.

गुरूवारी सकाळी 10.30 ते 11 वाजे दरम्यान, समिती जिल्हयातील विधानमंडळाच्या सदस्यांशी शासकीय विश्रामगृहावर चर्चा करणार आहे.11 ते 11.30 दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाजयांशी समितीची चर्चा होईल. 11.30 वाजता समिती जिल्हा परिषदेत आगमन होईल. सन 2016-17 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील नाशिक जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदा संदर्भात आढावा होईल.

शुक्रवारी (दि.27) समिती जिल्हयातील ग्रामीण भागाती पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देतील. शनिवारी (दि.28) समिती पुन्हा जिल्हा परिषदेत सन 2017-18 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवाला संदर्भात आढावा होईल.

अधिकारी-सेवकांची मेहनत

समितीसाठी जिल्हा परिषदेत जोरदार तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. समितीसाठी लागणारी माहिती गोळा करण्यासाठी दोन आठवडयांपासून रात्र-दिवस अधिकारी-कर्मचारी मेहनत घेत होते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करीत होते. बुधवारी प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेण्यात आला.

समितीतील सदस्य

आमदार संजय रायमुलकर (समिती प्रमुख), सदस्य – आमदार प्रदीप जैस्वाल, कैलास पाटील, डॉ. राहुल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीप बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधवराव जवळगावकर, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, विजयकुमार गावित, डॉ देवराज होळी, कृष्णा गजबे, राणा जगजितसिंह पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजुरकर, निरंजन डावखरे, सुरेश धस.

विशेष निमंत्रित : किशोर आप्पा पाटील, जंयत पाटील, बाळाराम पाटील, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे, महादेव जानकर, सदाशिव खोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या