Friday, February 6, 2026
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात दिड वर्षीय चिमुकली ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दिड वर्षीय चिमुकली ठार

आईवडीलांसमोरच घडली घटना

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

आई-वडिलांदेखतच बिबट्याने (Leopard) दिडवर्षीय चिमुकलीला उचलून नेवून ठार (Death) केल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील हिवरगाव पावसा (Hivargav Pavasa) येथे बुधवार (दि. 10 जुलै) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे. ओवी सचिन गडाख असे ठार (Death) झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

- Advertisement -

हिवरगाव पावसा (Hivargav Pavasa) गावांतर्गत असलेल्या गडाख वस्ती येथे सचिन गडाख हे शेतकरी (Farmer) राहात आहे. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे सचिन त्यांची पत्नी स्वाती व सुनील शांताराम गडाख हे सर्वजण घरासमोर होते. त्याच दरम्यान दिडवर्षीय चिमुकली ओवी ही अंगणात खेळत होती. मात्र याठिकाणी असलेल्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) अचानक ओवीवर हल्ला (Attack) करत तीला उचलून नेवून धूम ठोकली. डोळ्या देखत बिबट्याने ओवीला उचलून नेल्याने सर्वांनी मोठ्याने आरडाओरड करत गिन्नी गवतापर्यंत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र गिन्नी गवत खूप मोठे होते. त्यामुळे बिबट्या दिसत नव्हता जवळपास पंधरा ते वीस मिनीटे शोध घेतल्यानंतर ओवी जखमी (Injured) अवस्थेत गिन्नी गवतात आढळून आली.

YouTube video player

त्याचवेळी देवगड विद्यालयाचे शिक्षक संतोष तातळे, मदन माने, दिनेश थोरात हे तेथून जात होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या ओवीला संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ओवीच्या मानेला बिबट्याने गंभीर जखमा झाल्याने उपचारादरम्यान तीचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. घटनेची माहिती समजताच भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी रूग्णालयात धाव घेत वरिष्ठांना माहिती दिली. बिबट्याच्या दहशतीमुळे गडाख वस्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने (Forest Department) त्वरित याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

महायुतीची

Nashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये महायुतीची सत्ता; भाजपचा महापौर तर शिवसेना...

0
नाशिक | प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे....