Wednesday, January 7, 2026
HomeनगरLeopard Attack : निंबळकमधील 8 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

Leopard Attack : निंबळकमधील 8 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन दिवसांपूर्वीच नगर तालुक्यातील खारेकर्जुने (Karjune Khare) येथे पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने ठार केले होते. त्याच आता एमआयडीसी लगतच्या निंबळक (Nimblak) येथील कोतकर वस्तीवर राजवीर रामकिसन कोतकर या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack Child) केला. पण या हल्ल्यातून मुलगा बालबाल बचावला असला तरी गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत आहे. तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात बिबट्याचे (Leopard) दर्शन घडत आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने कुत्रे, बकर्‍या, गायी यांच्यावर हल्ले केले आहेत. पण आता बिबटे मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ले करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच खारेकर्जुने येथील रियांका पवार या पाच वर्षांच्या मुलीला सायंकाळी सुमारास पालकांच्या डोळ्यादेखत बिबट्याने (Leopard) पळवून नेले होते. तब्बल 16 तासांनी तिचा मृतदेह (Dead Body) सापडला होता. दरम्यान, गुरूवारी बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, या मागणीसाठी खारेकर्जुने (Karjune Khare) ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले होते.

YouTube video player

ही घटना ताजी असताना शुक्रवारी त्याच परिसरात एमआयडीसी (MIDC) लगतच्या निंबळक (Nimblak) येथील वैष्णव माता मंदिर परिसरात असणार्‍या कोतकर वस्तीवरील राजवीर कोतकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला. हा मुलगा सायंकाळच्या सुमारास खेळत असतांना बिबट्याने त्याच्यावर हल्ला (Leopard Attack) केला. नशीब बलवत्तर म्हणून तो बिबट्याच्या तावडीतून सुटला. मात्र, नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात राजीवर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अहिल्यानगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कोतकर वस्ती, निंबळक गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला
दोन दिवसांपूर्वीची खारेकर्जुने येथील दुर्दैवी घटना ताजी असतानाच शुक्रवारी निंबळक येथील राजवीर कोतकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला. हा बिबट्या आजवर खारेकर्जुने, निंबळक, इसळक, हिंगणगाव अशा परिसरात विविध ठिकाणी आढळून आला आहे. या नरभक्षक बिबट्याचा विषय प्रशासनाने आता गांभीर्याने घेतला पाहिजे. ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन त्याला ठार मारणे गरजेचे असल्याची मागणी डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.

डोंगरगण, मांजरसुंभ्यात दहशत
नगर तालुक्यातील उत्तरेकडील डोंगरगण, मांजरसुंभे गावात गुरूवारी रात्री गुरूवारी रात्री बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. यामुळे या भागात गुरूवारी रात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. नागरिक एकमेकांना बिबट्या आल्याची माहिती फोनवर देत सावध राहण्याच्या सुचना देतांना दिसले.

ताज्या बातम्या

BJP News : भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा दणका! प्रचार गीतावर आक्षेप,...

0
मुंबई । Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ शेवटचे सात दिवस शिल्लक...