Friday, May 3, 2024
Homeनाशिककळवण : बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार

कळवण : बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार

अभोणा । Abhona

कळवण तालुक्यातील बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात काल मध्यरात्री दोनच्या सुमारास एका नवीन बिबट्याचा थरार कैद झाला आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात वाघ यांच्या घराजवळ कनाशी वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात तब्बल दीड महिने हुलकावणी देत शिवारातील शेतकरी, नागरिकांचा जीव टांगणीला लावणारा बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र या नवीन बिबट्याच्या दर्शनाने शिवारात पुन्हा भीतीचे सावट वाढले आहे.

बिबट्याने गोठ्याभोवती असलेल्या सातफुटी संरक्षक जाळीवरुन उडी घेत गोठ्यातील गायीवर हल्ला केला, मात्र गायीचा जीव वाचविण्यासाठी धडपड बघुन तेथून पळ काढत कुत्र्याची शिकार करुन त्याला उचलून नेल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या