Wednesday, March 26, 2025
Homeनगरबिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून एका घोडीला ठार (Mare Death) केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील वडगाव शिवारात घडली आहे. शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याने घोडीवर हल्ला (Leopard Attack Mare) करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वडगावच्या शिवरात गारमाळ वस्ती असून त्या ठिकाणच्या नवनाथ दादा शेळके यांच्या शेतात ही घटना घडली आहे. यापूर्वीही बिबट्याचा वावर या परिसरात दिसून आला होता.

- Advertisement -

वनविभागाकडून (Forest Department) बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात अनेकदा पिंजरे लावण्यात आले होते.पाथर्डी तालुक्यातील वडगाव गाव हे पूर्व भागात असून बीड जिल्ह्याच्या हद्दीला लागून आहे. त्यामुळे कधी हे बिबटे बीड जिल्ह्यात तर कधी अ.नगर जिल्ह्यात असा त्यांचा प्रवास असतो त्यामुळे पाथर्डीच्या वनविभागाला कारवाई करणे हे कठीण जाते. बिबट्याचा वावर या ठिकाणी कायम आणि मोठी दहशत असल्याने आधीपासूनच या ठिकाणी बिबट्याला (Leopard) अटकाव करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आलेला होता. मात्र बिबट्या पिंजर्‍यात न अडकता त्यांनी घोडीवर हल्ला चढवून जागीच ठार केले. वडगावच्या गारमाळ वस्ती परिसरात डोंगर परिसर आहे.

त्या ठिकाणी सतीश रामभाऊ ठोंबरे (रा.एकनाथ ता.पाथर्डी) हे मेंढ्या चरण्यासाठी राहोटी ठोकून मुक्कामी होते. त्यावेळी शनिवारी रात्रीच्या वेळी हा बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून घोडीला ठार केले. ठोंबरे यांच्याही घटना रविवारी सकाळी निदर्शनात आली. घटनेची माहिती मिळतात वनपरिक्षेत्राधिकारी अरुण साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बबन मंचरे, वनरक्षक सविता रायकर यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पालवे, शहादेव सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. मृत घोडीचे शवविच्छेदन करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vidhan Sabha Deputy Speaker: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज...