Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याने साडेतीन वर्षीय बालकावर हल्ला करून नेले ओढून; शोधमोहीम सुरु

बिबट्याने साडेतीन वर्षीय बालकावर हल्ला करून नेले ओढून; शोधमोहीम सुरु

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

वडनेर दुमाला गावात शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री सुमारे आठ वाजता साडेतीन वर्षीय आयुष किरण भगत या बालकावर बिबट्याने हल्ला केला व त्याला ओढत घेऊन गेला.

YouTube video player

मुलगा घरात नसल्याचे समजल्या वर त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध सुरू केला असता घरच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराच्या बाहेर रक्त व काही अंतरावर बालकाची पॅन्ट आढळली, घटनेची माहिती समजतात स्थानिक लोकप्रतिनिधी,पोलीस पथक व गावकरी युवकांनी बालकाचा शोध सुरू केला, अंधार असल्याने शोध घेणे अवघड झाले आहे. काही ड्रोन पथकाच्या मदतीने शोध घेत आहे

तर रात्री उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी पोलीस आयुक्तातील डॉग्सकॉड गुगल श्वान पथकाच्या मदतीने तसेच ग्रामस्थांसह वनविभागाचे पथक बालकाचा शोध घेत आहेत

अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले असून, ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...