Tuesday, June 25, 2024
HomeनाशिकNashik News : मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Nashik News : मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

- Advertisement -

नाशिक-पुणे महामार्गावरील तालुक्यातील मोहदरी घाटात आज (दि.20) रात्री 8.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या (Leopard) ठार झाल्याची घटना घडली आहे…

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोहदरी घाटामध्ये वनराई फुलली आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवतांची वाढ झाल्याने बिबट्यांना लपण्यासाठी या ठिकाणी जागा मिळत आहे. तसेच मोहदरी वन उद्यान परिसरात वन्यजीवांचेही प्रमाण अधिक आहे.

Abdul Sattar : कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री सत्तारांचे पणन आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

त्यामुळे बिबट्यांचे वास्तव्य या ठिकाणी नेहमीच असते. भक्ष्याच्या शोधात असलेला एक बिबट्या मोहदरी घाटातून जाणारा महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. जबर मार लागल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गाने जाणाऱ्या वाहनांनी तात्काळ याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्यासह सेवकांनी तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली. यानंतर बिबट्याला मोहदरी वन उद्यानात नेण्यात आले. रात्रीतून या बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वन सेवकांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Rahul Gandhi : महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा पण ओबीसी समाजाला…; राहुल गांधींची लोकसभेत मोठी मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या