Friday, September 20, 2024
Homeनगरबिबट्याने डॉबरमन कुत्र्याचा पाडला फडशा

बिबट्याने डॉबरमन कुत्र्याचा पाडला फडशा

राहाता (तालुका प्रतिनिधी)

- Advertisement -

राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवरातील चोळकेवाडी बिबट्याने एक इंग्शिल कुत्रे फस्त केले. बिबट्याने चोळकेवाडी, मोरवाडी, अस्तगाव परिसरात दहशत निर्माण केली असल्याने या बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

शुक्रवारी पहाटे दरम्यान रविंद्र शिवाजी नळे यांचे डॉबरमन जातीचे दिड वर्ष वयाचे कुत्र्याचे पिल्लु चिकुच्या झाडाला बाहेर बांधलेले होते. नळे याच्या घराच्या आजुबाजुला डाळींब बाग तसेच उसाचे क्षेत्र आहे. पहाटे बिबट्याने येवून साखळी तोडून कुत्र्यास घेवून पसार झाला.

सकाळी पाच वाजता नळे झोपेतुन जागे झाल्यानंतर त्यांनी बाहेर येवून बघितले तर कुत्रे झाडा खाली दिसेने त्यांनी जवळ पाहिले तर साखळी तुटलेली दिसली त्यावरुन नळे यांनी कुत्र्याने नेल्याचा अंदाज बांधला.

हे हि वाचा : Ladki Bahin Yojana : जिल्ह्यातील बँकांत ‘लाडक्या बहिणीं’ची एकच गर्दी

दरम्यान मादी बिबट्या व तीचे दोन बछडे असल्याचे तेथील रहिवशांना खात्री आहे. दोन दिवसांपुर्वी मोरवाडी चोळकेवाडी शिवारात काहींनी बिबट्या पाहिला. रात्री साडेनऊच्या दरम्यान बिबट्या दिसल्याने या दोन्ही वाड्या प्रचंड दहशती खाली आहेत.

अक्षय सुरेश चोळके व मंगेश इंद्रभान नळे, शुभम बाळासाहेब नळे या तिघांनी इंद्रभान नळे यांच्या वस्तीजवळ दोन दिवसांपुर्वी पाहिले असल्याचे रविंद्र नळे यांनी सांगितले. दरम्यान शाळकरी मुलेही शाळेत जाण्यास घाबरत आहेत.

हे हि वाचा : “आता फक्त ‘कार्यक्रम’ करायचेत”, सुजय विखे असं का म्हणाले?

मोरवाडी, चोळकेवाडी, तसेच तरकसवाडी भागातील मुले वस्त्यांवरुन पायी शाळेत येतात. वनविभागाने या बिबट्यांना तात्काळ पिंजरा लावुन जेरबंद करावेत, अशी मागणी रविंद्र नळे व मोरवाडीच्या पोलिस पाटील निता मोरे, घनश्याम मोरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या