Saturday, April 26, 2025
Homeनगर"आता फक्त 'कार्यक्रम' करायचेत", सुजय विखे असं का म्हणाले?

“आता फक्त ‘कार्यक्रम’ करायचेत”, सुजय विखे असं का म्हणाले?

अहमदनगर । प्रतिनिधी

कांद्याला आता ३८ रुपये भाव मिळत आहे. हाच भाव लोकसभेपूर्वी १४ रुपये होता. त्यावेळीच कांद्याला भाव ३८ रुपये असता, तर मी माजी झालोच नसतो. इंग्रजीच महत्व त्यावेळी मी पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू लोकांना ते पटलं नाही. असो आता माझ्याकडे खूप वेळ आहे. आता फक्त कार्यक्रम करायचे, आहेत असा सुचना वजा इशारा माजी खा. सुजय विखे पाटील यांनी दिला.

- Advertisement -

नेप्ती उपबाजार समितीमध्ये गुरुवारी विविध कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यात कांदा बाजार भाव डिजीटल फलकाचेही अनावरण करण्यात आले. या कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर माजी खा. डॉ. विखे पाटील बोलत होते. नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे.

हे हि वाचा : ‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

पारदर्शी कारभार करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग १५ वर्ष एकहाती सत्ता मतदारांनी दिली आहे. तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्यामुळेच या बाजार समितीने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. काही कारणांमुळे बाजार समितीची प्रगती खुंटली होती. परंतु आता लवकरच बाजार समितीचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समिती नेप्ती उपबाजार समितीचे नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर नामकरण समारंभ सोहळा गुरुवारी पार पडला. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, माजी आ. अरुण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर, माजी आ. नामदेव पवार, माजी आ. अण्णासाहेब माने, मंगलदास बांदल, सचिन कोतकर, संचालिका सुरेखाताई कोतकर, माजी उपहापौर सुवर्णाताई कोतकर, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, अक्षय कर्डिले, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, चेअरमन विलास शिंदे, रावसाहेब पाटील शेळके, अविनाश घुले, सहसचिव सचिन सातपुते यांच्यासह बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, केडगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे हि वाचा : विदर्भात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा पक्षाला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती

माजी सभापती कोतकर यांनी नेप्ती उपबाजार समिती उभारणीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, संचालक मंडळ, कर्डिले यांच्यामुळे ११ महिन्यांत नेप्ती उपबाजार समितीची उभारणी केली. बाजार समिती शेतकऱ्यांचा कणा आहे. मी जरी पुण्याला असलो तरी माझे बाजार समितीमध्ये काय चालते याकडे लक्ष आहे. बाजार समितीच्या संचालक, सचिव, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बाजार समितीतील आवक घटली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने पुणे, नाशिकला शेतीमाल विक्रीसाठी नेला जात आहे. याची मी सरदवाडीमध्ये गाड्या थांबवून चौकशी केली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करा. तरच बाजार समितीचा नावलौकिक कायम राहील. संचालक, सचिवांनी बारकाईने लक्ष देवून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

नातीने केले आजोबांच्या गाडीचे सारथ्य

नेप्ती उपबाजार समितीच्या नामकरण सोहळ्यापूर्वी माजी सभापती कोतकर यांचे स्वागत करण्यात आले. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी महापौर संदीप कोतकर व माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांच्या कन्या पेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या श्रुतिका कोतकर यांनी आजोबा भानुदास कोतकर यांच्या गाडीचे सारथ्य केले. संचिता सचिन कोतकर, साईशा अमोल कोतकर या तिघी बहिणींनी आजोबांना सभास्थळापर्यंत आणले. सभेदरम्यान उदयनराजे संदीप कोतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हे हि वाचा : आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरूणांची फसवणूक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून...

0
नवी दिल्ली | New Delhi जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर (Attack) भारतीय लष्कर आणि सुरक्षा...